रविवार, ३१ जानेवारी, २०१६

जीवन उधारी







चल रे मित्रा  उचल पावुला
संपला इथला बाजार हा ||
किती चढाओढ चाले घासाघीस
जगण्यास मिष शोधलेले ||
धन वेचलेले पाय थकलेले
उगा जमवले काही बाही ||
आताच सरला भरला गोंगाट
डोळयात वाट घरट्याची ||
माझिया दत्ताची काय करामत
लोटले जगात कळावया ||
कळले काही येवूनी बाजारी  
जीवन उधारी मरणाची  ||
विक्रांता कळले निघाले दिवाळे  
हातात राहिले दिस काही  ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शनिवार, ३० जानेवारी, २०१६

फायली गं फायली








फायली गं फायली
सांग काय करशी
नस्ति होशी का
सहीसाठी जाशी

कधी तुझ्या डोईवर
महत्वाचा ठपका 
कधी गोपनीय तू
सगळ्यांना धसका

कधी फिरे इथेतिथे
छोट्या चुकासाठी
कधी कुणी टोलवी
काम टाळण्यासाठी

कधी असे तुझ्यावर
नको तोच शेरा
कुणामागे लागे मग
नको तोच फेरा

रोज एक जन्म
नव्या करामातीला  
नवा सूर्य उगवतो
ओझे वाढवायला

आवरणात तुझ्या
काय काय लपे
कुणी होई भणंग
कुणी नोटा छापे

कुणाचे करार तर
कुणाची तक्रार
सांभाळशी गुपचूप
तू बिलांचे प्रकार

सभोवती शुभ्र असे    
फाईलींचा  गराडा
कुणा  शोधू कुठे  
डोक्यामध्ये राडा

सवे माझ्या रोज  
काही येती घरी
नच संपणारी ही
असे खातेदारी

बायको म्हणे सवत   
पोरे पांढरी म्हातारी
सवे तिच्या चढे पण
नशा काही न्यारी

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...