गुरुवार, १२ जून, २०१४

वडाचे मरण




वडाच्या झाडाचे
तुकडे करून
मग तयाला
भावे पुजून
तुमच्या त्याचे
आयुष्य अजून
देईल का तो
सांगा वाढवून  
पूजा म्हणजे का
असते कापणे
देवावरीच त्या
शास्त्र ओपणे
मरण पतीचे
घेतात ओढून
करंट्या बायका
वडास तोडून
कसली हौस
सात जन्माची
बात जमेना
अजून आजची
सोंगा धोंगात
दुनिया चालते
वडाला मरण
उगा ओढवते

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




बुधवार, ११ जून, २०१४

वट पौर्णिमेला





प्रत्येक वट पौर्णिमेला मला
न चुकता फसलेला यम आठवतो
बायका किती वस्ताद असतात
मी मनात अधोरेखीत करतो
पुन्हा संसारात आणलेल्या
सत्यवानाची कीव करतो
भोग बाबा आता आपल्या
कर्माची फळ, मनात म्हणतो .
सात पावलात अडखळलेले
ते हजार संसार आठवतो  
वडाचे तुकडे घेवून जाणाऱ्या,
सुत गुंडाळणाऱ्या बायकांना मानतो   
जणू अट्टाहासाने स्वत:साठीच  
केलेली जाहिरात मी पाहतो   
किती केविलवाण्या असतात
काही प्रथा का आपण पाळतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


मरणाच्या दारात






मित्रांनो ,
खरच सांगतो
वेदनांनी विव्हळत
दुखांनी पिळवटत
मरणाच्या दारात
रडत अन रखडत
मी मरणार नाही
मी घुसेन आत
मृत्युच्या गुहेत
उघड्या डोळ्यांनी
शेवटच्या माझ्या
श्वासाला बघत
फेकून देत
देह कलेवर
एकाच क्षणात
**
तुम्ही म्हणाल
ही तर चक्क
आत्महत्या आहे
जीवनाचा त्याग
हा नक्कीच
भ्याडपणा आहे
पण यार हो
रिसायकलिंग देहाचे
गीतेचा फंडा आहे
कपडे बदलणे हा
आत्माचा धंदा आहे
कृष्ण माझ्या मरणाचा
वकील अन खंदा आहे
**
आणि म्हणाल जर
आत्महत्यारा पापी
भूत योनीत जातो
वर्षोनुवर्ष अतृप्तीत
उगाचच भटकतो
चिंता करू नका
एक छान भूतीन
तिथेही शोधीन
अन तिच्यावर
कविता करीत राहीन
ऐकायला यायचे तर.. 
..बघा वाट पाहीन .
पण हा देह
तोवरच वाहीन
जोवर मजला
वाहता येईन 
वेदनेच्या ओझ्यासह
हसत जगता येईन
**
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

 

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...