पंचतत्त्व लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पंचतत्त्व लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

चांदण्याचे तळे

चांदण्याचे तळे
************
पंचतत्वाचाच देह   पुन्हा पंचतत्वी गेला 
पाश माया ममतेचा   एक तुटूनिया गेला

पाश घरातले सारे     तया घरीच राहिले 
चूड देऊनिया देहा     सारे प्रियजन गेले 

इथे येऊन लाखदा     मना जग हे सुटेना 
देहबंधाची या गोडी    मुळीसुद्धा सोडवेना

आले गेले प्रियजन     तया जगात गुंतले 
पंच इंद्रिया सकट       सुख दुःखात बुडाले

दुःख कुणाचे कुणाला   शुष्क व्यवहार सारे 
शोध सुखाचा सदैव     जगी वाहतात वारे

याद मरणाची मनी       सारे वागवती जरी 
क्षण भोग हातातले       घेती कवळून उरी

तुझे मरण विक्रांता       नसे फारसे वेगळे
नको गुंतवू जीवास       जग चांदण्याचे तळे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

चांदण्याचे तळे

चांदण्याचे तळे ************ पंचतत्वाचाच देह   पुन्हा पंचतत्वी गेला  पाश माया ममतेचा   एक तुटूनिया गेला पाश घरातले सारे     तया घ...