दत्त भेटी लागी
************
दत्त भेटी लागी दत्त होणे पडे मोडूनिया वेढे कामनांचे ॥
आम्हा हवा दत्त कामात भोगात
धनसंपत्तीत जगतांना ॥
तर मग दत्त होय दिवा स्वप्न
लोभी मरे मन लोभातच ॥
सरावे म्हणून लोभ न सरती
काम क्रोध घेती वेटाळून ॥
वैराग्यावाचून घडेना साधन
विवेकावाचून मार्ग नाही ॥
म्हणूनिया आधी मागावे ते दान
भक्तीला जोडून दयाघना ॥
तरीच ती काही इथे असे आशा
अंतरीची दिशा पाहण्याची ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा