शनिवार, १२ जुलै, २०२५

रुतलेली आठवण

रुतलेली आठवण
**************
मला घेरून राहिलेले
हे एकाकी एकटेपण
सवे माझी फुटकी नाव 
अन निरर्थक वल्ह्वणे

तरीही होतेच माझे हाक मारणे
गळा सुकवणे
सारे काही दिसत असूनही
कोणी येण्याची शक्यता नसूनही
डोळ्यात धुक दाटणे

अन दिसते अचानक 
एका उंच लाटेचे उठणे
नखशिखात भिजायचे ठरवूनही
उरते माझे कोरडे ठणठणीत राहणे

मग मीच होतो
ती नाव बुडू पाहणारी
पण ती रुतलेली आठवण
मला बुडू देत नाही ठेवते तरंगत
नव्या लाटेची प्रतीक्षा करण्यासाठी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कोरे पान

कोरे पान  ******** बोल सखीचे चैत्र चांदणे नसून शब्दी उगा सांडणे  गूढ नव्हते गुपित काही  झऱ्यागत ते मुक्त वाहणे काही घटना काही घड...