वारी
*****
येताच आषाढी निघाले भाविक बांधून पडशी जग हे मायीक ॥१
लोट लोटावरी धावती प्रेमाचे
जणू अनिवार जल उधाणाचे ॥२
तयांची ती चिंता अवघी देवाला
सांभाळी चालवी धरून हाताला ॥३
चालतो कुणी घेऊन शिदोरी
कुणी तो दुसरा मागतो भाकरी ॥४
वाहतो पाण्यात थोडासा कचरा
पण निर्मळता नच सुटे जरा ॥५
धन्य पायपीट चालते सुखात
देवाच्या कृपेची खूण पाऊलात ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा