गाठ
*****
दत्त राम कृष्ण एकच चैतन्य नाव आन आन जरी त्यांची ॥
शारदा कालिका लक्ष्मी रूप छान
पदी होता लीन शांती लाभ ॥
परि देव देवी वरती भक्ताला
लावती भक्तीला निज ठाई ॥
जयाचे आराध्य तया तेथे गती
अन्यथा पडती येरझारी ॥
म्हणूनिया मना स्मर त्या रूपाला
ठेवी हृदयाला तेच एक ॥
कळता कळते खूण ही मिळते
मनात बसते गाठ घट्ट ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा