स्वप्न
*****
मनी पाझरले शरद चांदणे ॥१
स्निग्ध मुग्ध मंद नित्य शितलसे
तृष्णेला तृष्णेचे जिथे लागे पिसे ॥२
पुन्हा पुन्हा मन होवून चकित
सांगते स्वतःला स्वप्न हे खचित ॥३
होते भाग्य कधी असे मेहरबान
पुण्य येथे फळाला लाभते वरदान ॥४
मागण्याचा माझ्या साऱ्या अंत झाला
याहून मधू काही न भेटले जीवाला ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा