बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

गिरनार गुरू शिखरावर


गिरनार गुरू शिखरावर 
***********

आनंदाचे फुल आले वेलीवर 
आनंदाची झुल पानापानावर . ॥

आनंदाची गाणी आनंदल्या मनी
आनंदे भरला देह सरोवर ॥

सोनिया उन्हात झळाले शिखर
पाहियले देव दत्त गुरूवर  ॥

काय किती वदू नवाई नित्याची 
अनिकेत खेळे  इथे घर घर ॥

इवल्या देहाच्या खोळीत विक्रांत
कवळे अथांग क्षितिज अपार ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

करुणा

करुणा *******  करुणा दत्ताची वचने प्रेमाची  रत्ने शब्दांची मनी येती ॥ दत्तकृपेचा हा भरा ये सागर  लाटा लाटा वर उसळती ॥ तोच लिहवित...