सँप
****
ते पुराणे मस्टर माझे मला कोणी द्यावे रे हे सॅपचे भूत वेडे आता उरावर नको रे ॥१
ती तांबडी खूण क्रॉसची पुनपुन्हा दिसू दे रे
ते रजेचे हिशोब आणि नीट मला लागू दे रे ॥२
पडेल ए एन एम का लागेल ती हजेरी
चिंता हीच चित्तास सर्वदा या लागलेली ॥३
कधी नेट नसतेच वा कधी मशीन बिघडते
वहीतल्या हजेरीचे कुणा ठाव काय होते ॥४
असे बॉस एच आर वाला सदैव तो कावलेला
पगार त्याने उगा कापला न्याय असे कुठला ॥५
हि तो चक्क दादागिरी शोभतें न मुळी त्याला
असेल काय कायदा हा प्रश्न मनी पडलेला ॥६
नटवले माकडांना नेसवून पॅन्ट त्यांनी
चढता न ये झाडावरी उपाशी फळ पाहुनी ॥७
असेच काही झाले इथे व्यय तो आणिक वाढे
फाटकेचे वस्त्र अंगी हाती मोबाईल महागडे ॥८
महागडे सॉफ्टवेअर घेऊन ते पस्तावले
राग कुणाचा कुणावर काढत नि बैसले ॥९
वर्ष इतकी चाललेले काय ते वाईट होते
समोरची काळे पांढरे हिशोब स्पष्ट होते ॥१०
मान्य ते करणार नाही चूक हे म्हणणार नाही
मुरतेय पाणी कुठे ढुंकूनी पाहणार नाही ॥११
पारदर्शकता ती म्हणे फक्त आहे डोंबलाची
छिद्रे तशीच गाळणीला पण चहा गळत नाही॥१२
हात हाती बांधलेले गाठ गाठी मारलेले
जया ठाव चोरवाटा तिथे कुलूप लावलेले ॥१३
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा