गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

दत्त भगवंत

दत्त भगवंत
*********

अनादि अनंत 
दत्त भगवंत 
सर्व हृदयात 
वास जरी ॥

शोधून दिसेना 
भजून मिळेना 
सहजी कळेना 
आदेश तो  ॥

व्यापतो जगाला 
व्यापतो कणाला 
हरेक मनाला 
सुखावतो ॥

गोवून रूपात
घालून नामात
बळे त्या विश्वात 
आणियले

जरी का राहतो 
शब्दाच्या अतीत 
तेवतो सतत 
आत्मरुपी ॥

विक्रांत अंतरी 
घालतसे उडी 
पाहे घडी घडी 
रूप त्याचे

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शोध

शोध **** श्रेयाच्या शोधात चालतांना  जगण्याचे इप्सित गाठतांना  श्वासात श्वास असे तोवर  आकाशपाताळ एक कर  पालथ्या घाल दाही दिशा  वि...