मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

त्रिकुट शिखरी


त्रिकूट शिखरी
***********

त्रिकूट शिखरी 
असे दत्तनाथ 
जैसा आकाशात 
गिरनार 

तया ना आकार 
रूपाचा प्रकार 
जाणीवे आधार 
आत्मभान

तिथे ना उजेड 
तिथे ना अंधार 
चैतन्य अपार 
साठवले

पवना वाचून 
उठते वादळ 
सुखची सकळ 
वेढलेले 

नसे आठवण 
नसे विस्मरण 
आहे म्हणे क्षण 
शब्दाविना 

अनंत अपार 
असीम शून्यात
जाणे हरवत
स्वप्न गमे

दत्ताच्या जगात
विक्रांत ही दत्त 
सारे अवधूत 
दत्त दत्त


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...