बुधवार, ९ मार्च, २०१६

देहाचा या वृक्ष








देहाचा या वृक्ष
हलतो डोलतो
श्वासाच्या लयीत
गरारा फिरतो

डोळ्यांच्या गुहेत
खेचरी ओढतो
हर क्षण कण
कातळ कोरतो

पेटल्या आगीत
महाल जळतो
जनकाचा भाव
तटस्थ पाहतो

कुणाचा हा देह
कोण चालवतो
मनाचे वादळ
कोण उठवतो

पाहणारा डोळा
कुठे उगवतो
श्रीदत्त कृपेत
विक्रांत नाहतो

विक्रांत प्रभाकर तिकोणे

३ टिप्पण्या:

युगे साक्षीदार

साक्षीदार ******** अनंत असतो प्रवास जीवाचा मातीत रुजून  विशाल व्हायचा ॥ नव्या रुजण्यात म्हणते जीवन नव्या उमेदी मी आकाश होईन ॥ घड...