रागावता साहेब मजला
खुप राग आला
तडकाफडकी मी बसलो
कविता लिहायला
सणसणीत उगाळलेले
शब्द काढले शोधून
अन शिव्या काही
यमकात टाकल्या घोटून
तडकाफडकी तसाच राग
माझा शांत झाला
म्हटलो चला
कवितेला एक विषय मिळाला
जरा विसावतो तोच एक
डास खुळावला
येवून कडकडून चक्क
मजला चावला
पेपरने मारता
मरता हुलाकावून गेला
ओहोहो दुसरी
कविता आली उदयाला
रक्त रंजित पिसाट
अन अर्थ कोंबलेला
तसाच पेपर
विस्कटून घरभर पसरता
प्रतिभेला बहर
आला बातमीत डोकवता
तडकाफडकी पुन्हा
बैठक रचली कविता
एकही न्यूज न
जावो काही न लिहता
डोळा ठेवून होतो तसाच
दुज्या पेपरवरती
सोन्याचीच मजला
सारी रद्दी वाटत होती
त्या रद्दीवर
प्रेम पाहूनी पोर अंग चोरती
प्रात:काळी
विधीसाठी त्यावर नच बसती
दारावरी यावया
कुण्या न हिम्मत रद्दीवाल्या
फरक हिलाही कळेना
काय द्यावे ते त्याला
तडकाफडकी रास रचली
मी शीघ्रकाव्याची
जे न म्हणती
ग्रेट मजला त्यांच्या मा**
विक्रांत
प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा