देहाचा या वृक्ष
हलतो डोलतो
श्वासाच्या लयीत
गरारा फिरतो
डोळ्यांच्या
गुहेत
खेचरी ओढतो
हर क्षण कण
कातळ कोरतो
पेटल्या आगीत
महाल जळतो
जनकाचा भाव
तटस्थ पाहतो
कुणाचा हा देह
कोण चालवतो
मनाचे वादळ
कोण उठवतो
पाहणारा डोळा
कुठे उगवतो
श्रीदत्त कृपेत
विक्रांत नाहतो
विक्रांत
प्रभाकर तिकोणे
Khup khup chan kavita sir :)
उत्तर द्याहटवाthanks
उत्तर द्याहटवाthanks Ajit
उत्तर द्याहटवा