रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

वादळवारं






सुटलं आहे वादळवार
घट्ट लावून खिडक्या दार
थोपावत आहे मी सार
प्राणपणान लावून जोर
जुनी आहेत माझी दार
अन गंजलेली बिजागर
किती जरी दिला आधार  
अखेर तुटून पडणार
सांभाळ हे करुणाकर
तुझंच आहे सार
मी आणि हे वादळवार
रे उघडतोय दार

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

समुपदेशन ...स्थानी





मी अन ती नकळे कसे सोबत जगतो
एकमेका शाप देत उ:शाप जणू भोगतो
ओंजळी भरून सुख धावुनी मी आणतो
कोरडेच हात तिचे ओठ कोरडे पाहतो
साचली पाप मागील जन्मात या फेडतो
का नवीन बंध बेगडी गळ्यात या बांधतो
होणार ना सुटका जरी वाट सदैव पाहतो
घालून कोट लत्करी मखमली मिरवतो
मोडलेला डाव माझा बळे मनी दडवतो  
खेळणे दैवे प्राप्त जे गपगुमान खेळतो
हीच कारा हीच कबर जन्मठेप मानतो
काय केला गुन्हा परी ते नच जाणतो 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

अंकुर तुझ्या गर्भीचा




अंकुर तुझ्या गर्भीचा 
सुखरूप वाढू दे गं
सारे आकाश तयाच्या
मुठीमध्ये येऊ  दे गं 

कर पाळणा हाताचा 
शब्द ओठात पेर गं 
हात धरुनी चालता 
अष्टभुजा तू होई गं 

सान पायाखाली ठेव 
नजर अंथरुन  गं
भरारीत गरुडाचे 
भरूनिया दे बळ  गं

ऐक आणखी  तयास
तुझ्यासारखे कर गं 
फुलागत जपायचे 
हळुवारपण देई गं 



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०१५

अंध भक्ती ,






मुंगीला आधार
साखर कणात
तैसी माझी गत
प्रभूदारी ||
वेड्याचे चित्त
राही भटकत
सदैव शोधत
चाळा काही ||
जया ज्यात सुख
तया ते कौतुक
भरपोटी भूक
कुणा लागे  ||
डोळस का अंध
कळेना मजला
प्रेमात मातला
भक्तीभाव ||
तुम्ही ज्ञानवान
सुक्ष्म बुद्धिवंत
बालका खेळात
रमू द्यावे ||
इतुके मागणे
मान्य करुनिया
गेला तरी वाया
जावू द्यावे ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...