रविवार, ११ जानेवारी, २०१५

संकीर्तनी





तुझे भक्त गाती
संकीर्तनी नाचती   
नकळे कसे काय
झपाटूनी जाती  

तो नाद तो आवेग
भक्तिभाव पाहूनी
मी ही जातो कधी
गर्दीत त्या मिसळूनी  

नाचतो अन गातो
हात ही उंचावूनी   
रितेपण माझे जाते
रिते रितेच राहुनी   

गमते मजला मग
व्यर्थ सारी करणी   
थांबतो मी येतो
बाजूस नाईलाजानी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




दे विचारणा ..










माझ्या विकल
अस्तित्वाचा
कणकण व्यापणारी
दे व्याकुळता

रोज मरणाऱ्या
या जगण्यातून
उसळून उठू 
दे अस्वथता

अष्टौप्रहर
पेटत राहणारी
विचारणा दे
या चित्ता

का कुठून अन
कुठवर कशाला
आगीत राहू दे
मज जळता

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...