माणूस म्हणून
******
गेले किती जरी दूर
जीव तुटे तयासाठी
याद येता हूर हूर
रक्त माझेच तयात
गुणसूत्रांची रांगोळी
पंथ हातात दुसरा
तरी जीवलग सारी
वायु तोच तो प्राचीन
फिरे साऱ्या देहातून
जल शीतल मधुर
करे खोळीला धारण
तेच अनंत आकाश
तुज मजला व्यापून
भेद उगवतो वृथा
कोण्या भेद बुद्धीतून
द्वेष मोकळे हे मन
प्रेम भाव सनातन
आगा राहू दे विक्रांता
एक माणूस म्हणून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ **