चंद्रभागा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चंद्रभागा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

आषाढीची चंद्रभागा

आषाढीची चंद्रभागा 
***************
आषाढीची रम्य  दिसे चंद्रभागा 
क्षेम पांडुरंगा देत असे

मातीचा हा रंग घेत चंद्रभागा 
वाहतसे गंगा पुण्यदायी 

वाहते न माती ताप या जनांचे 
पाप रे जन्मांचे ओघामध्ये

दुर्गंधी वाचून होते वाळवंट 
आनंदाचे लोट भक्ता मनी

लाख लाख जन सुखात न्हावून 
पुंडलिका भेटून निघालेले

असेच रहावे सदा सर्वकाळ 
सुखाचे आभाळ दाटलेले

उमटे मनात सहज प्रार्थना 
देवा जनार्दना पूर्ण करी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

श्री वासुदेवानंद सरस्वती

प.प.श्री वासुदेवनंद सरस्वती महाराज **************** आनंदकंदा श्री वासुदेवनंदा  तोडी भावबंधा आमच्या तू देई ज्ञान शक्ती देई भावभक्...