नित्य निरंजन
***********
तन हलते अन् मन डोलते दत्त नाम हळू मनी उमटते
द्राम द्राम ध्वनीने जग भरते
वीज हृदयाच्या आत नाचते
कडकड डमडम एक नाद
राहे उमटत उरी पडसाद
रंध्रारंध्रा मधून शब्द उमटतो
दत्त दत्त हाच करीत निनाद
माथ्यावरती गिरनार हलतो
येई कृष्णा पूर अन् हृदयात
रोम रोमा मध्ये फुले औदुंबर
दिव्य दरवळ भरतो नभात
उघडून दिठी नाही उघडत
बाप भेटतो आत कळतो
ताप सरतो व्याप हरतो
नित्य निरंजन आत तेवतो
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
महोदय, खुपच छांन ,आताच अ.तृतीया सुरु झाली.आजच श्री दत्तभक्त परशुराम जन्म आहे. मी श्री दत्तावर संशोधनात्मक एकत्र माहितीचे पुस्तक लिहले असुन आता इंग्रजी आवृत्ति नियत आहे. No Loss No Profit त्यावर 170 पान चे पुस्तक फक्त ₹ 100 ला विकत आहे. कवितेकरिता , आपले अभिनंदन. डाॅ द.म.धर्माधिकारी , नागपुर. इमेल
उत्तर द्याहटवाpl send your email
उत्तर द्याहटवा