अधिकार
*******
जाणतो मी दत्ता माझा अधिकार झालो भुमिभार तुजविण १
मजहून श्वान बरे भगवन
पदी ते येवून बसे सुखे २
मज नाही ठाव कुठे तुझा गाव
ज्ञानाचा अभाव सर्वकाळ३
घर नाही दार फिरे वणवण
देहाला धरून रात्रंदिन:४
तूच तुझी वाट दाखव रे आता
सरो आटापिटा संसाराचा ५
विक्रांत निरर्थ फिरे गरगरा
धाव घे वासरा- साठी माय ६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा