धावणे
.*****
नको नको वाटते आता हे धावणे उगाच वाहणे दिनरात ॥
मातीवर माती थापूनिया माती
होऊनिया माती जाणे-अंती ॥
भंगुर सुखाची मांडली आरास
झाकून दुःखास ठेवलेली ॥
परी चाखताच चव कळू येते
गळून पडते आवरण ॥
काय अवधूता सरेल हे स्वप्न
उजाडून दिन कधीतरी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा