शनिवार, १९ एप्रिल, २०२५

युगे (उपक्रमासाठी )

युगे (उपक्रमासाठी )
**************"
भेटले नाही प्रेम तरीही 
उगाचच म्हणत राहायचे 
तुझे माझे नाते सखी 
आहे बघ युगायुगाचे 

हा जन्म गेला तर काय 
नव्या जन्मी भेटू आपण 
नव्या जन्मी प्रीत पूर्णत्वा
बघ नेऊ नक्की आपण 

कुठल्या टाळक्यात राहणार 
पण कधी जन्मलो मेलो होतो
अन् नक्की हे ही ठाव नसते 
मेल्यावर पुन्हा जन्म असतो

पण जन्म पुनर्जन्माचीही 
सायकोथेरपी काम करते 
तुटल्या हृदयाचे जोडणे 
छान पैकी होऊन जाते 

तिच्या सुखी संसाराचे 
चाक नीट रुळावर राहते 
म्हणून मला ती भगवद्गीता 
तर खूप खूप आवडते 

पण कोणी विचारू नका बरे 
की माझेही असे काय होते ?
की हे तत्त्वज्ञानी युग बहाणे 
मजलागी असे एवढे आवडते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रेघोट्या

रेघोट्या ****** मारुनी रेघोट्या  साऱ्या घरभर  उरली न जागा  कुठे कणभर  म्हणूनिया मग  केला अवतार  ओढून रेघोट्या  हात गालावर  काय त...