ठेवा
***"
पुन्हा पुन्हा किती मागु तुला देवा देई माझा ठेवा
मजलागी ॥१
देई रे भाकर एक चतकोर
तुझ्या दारावर
याचक मी ॥२
देई रे चिमूट तुझिया धुनीची
स्वप्न जगण्याची
मिटे ज्यानी ॥३
तुझिया प्रेमाचा घास अमृताचा
अर्थ असण्याचा
कळो जेणे ॥४
विक्रांत तृषार्थ कृपेच्या सागरा
यावा कळवळा
तुजलागी ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा