सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

उशीर (उपक्रमासाठी)

वेडा वृक्ष हा आता वठून गेला आहे 
पान पान सांडून जळून गेला आहे 
येता येता किती तू उशीर केला आहे 
वर्षाराणी जन्म हा सरून गेला आहे

एक एक बिंदू दवाचा वेचून जगत होतो 
पान पान वाचवत वाट पाहत होतो 
दिसायची दूरवर तू क्षितिजी मिरवतांना 
सावळ्या त्या बटावर स्वप्न उधळत होतो 

काय तुवा कळलेच ना हे अंतर जळत होते  निशिदिन स्मरत तुजला जणू तप करत होते झालोय असा बदनाम या प्रेमास जग हासते सरणासाठी फांद्यावर कुऱ्हाड आता चालते 

नाही कसे म्हणू मी तुवा अनंत दिधले होते कितीतरी ऋतू सुखाचे  देहात माळले होते  
येणे तुझे सुखावत झाड चिंब भिजले होते
तुझ्यासाठीच फांदीवर मखमल ल्यायले होते 

गेलीस कधीतरी तू पुन्हा आलीच नाहीस
न कळे कुठल्या जगात  हरवली होतीस
आलीस आता स्मरूनी वा सहजी अशी तू 
पण आता सांग इथे कुणा कशी भेटशील तू
********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्री जगन्नाथ कुंटे ऊर्फ अवधूतानंद यांना श्रद्धांजली

श्री जगन्नाथ कुंटे ऊर्फ अवधूतानंद यांना श्रद्धांजली   ******* पाहियले स्वामी अवधूतानंद शक्तिचा तरंग  उत्स्फुलित ॥१॥ पुत्र नर्मदे...