रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

प्रकाशाचे गाव





माझिया मनात
प्रकाशाचे गाव  
स्वामी दत्तराव 
असे तेथे

चैतन्याचे गाणे
घेवुनिया येतो 
उजळून देतो
कण कण

स्वानंद सुवर्ण    
उधळतो जगी
ऐश्वर्याचा भागी
प्रेमे केले

उदार दातार
मागे त्याला देई
न मागे त्यालाही
सर्व काही

विक्रांत उजेडी
पूर्ण सुखावला
तम विसरला
दत्त कृपे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍
*****************************************************************

शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

स्वीकारले जीणे





स्वीकारले जीणे  
आहे तैसे दत्ता
जगता जगता 
जाय पुढे 

दुःखाचे ओझे न 
सुखाची काळजी
रित जगण्याची 
जाणियली 

केवढा हा पसारा 
सांभाळसी प्रभू 
माझी मात सांगू 
काय तुला  

घडावे स्मरण
तुझे प्रेम भरी 
तेणे उपकारी 
सुखीया मी

आणिक ती काही
वांछा मनी नाही
सारे तुझ्या पायी
वाहीयले 

विक्रांत जगतो 
वाटेने चालतो 
दत्ताला पाहतो 
अंतर्यामी 
*
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

**

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

अवघे लाजिरे




अवघे लाजिरे

**********


अरे बुद्धी माझी
अजून वाकडी 
बसली बोंकांडी 
वृतीच्या रे

अहा वरवर 
पांघरले छान 
गुण आवरण 
दाखविण्या

परि हसतात 
सारे अवगुण 
घेतात गांजून 
पदोपदी 

काम क्रोध मोह 
नटले सात्विक 
लावतात भीक 
मागावया

साधनेचा दंभ 
साधक मत्सर 
बसे उरावर 
वेताळसा

मिळताच संधी 
येती उसळवून 
घेतात ग्रासून 
नभ सारे

असे हे पहाड 
कसे करू पार 
तुझाच आधार 
दत्तात्रेया

विक्रांत पाहतो 
पराभव सारे 
अवघे लाजिरे 
अवधूता


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

तुझिया प्रेमाने




तुझिया प्रेमाचा
जाहलो मी ऋणी 
सफल कहाणी 
जीवनाची 

धावलो वनात 
काट्या कुट्यातून 
संपाला तो शीण  
अवघाची 

पाहतो मागुती 
कौतुके वळून 
येतात भरून 
डोळे माझे 

देवे चालविले 
हाताला धरून 
कधी उचलून 
कडेवरी

अथवा हे वाड  
कसे होते पार 
विक्रांत आभार 
रूप झाला
...
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
 

*** 

बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९

सुखराशी


 सुखराशी  
******* 
माझी इवलीशी 
सेवा केली गोड 
आनंदाचे झाड
केले मज

झालो सुखराशी 
धनाने अपार 
बुडाता व्यापार
नफ्यातला 

आता मी मोकळा 
होऊनिया वारा 
धावतो भरारा 
तुझ्या दारी 

कृपेचे देऊळ  
बांधले मनात 
आला गाभाऱ्यात 
स्वयमेव 

दत्त कल्पद्रुम  
रत्न चिंतामणी 
उघडली खाणी  
भावभक्ती 

विक्रांत सुखाच्या 
कल्लोळी लहर 
दत्त तटावर 
विसावली
.
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



**


सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

क्रोध





क्रोध   
-----

घसरतो दत्ता
पुन:पुन्हा पथा
क्रोधाचा हा गाडा
अनावर

इवल्या मनाचा  
मोठा बुडबुडा
रिकामा खडाडा
वाजे डबा .

कळते मनाला
जरी चुकलेले
परि न थांबले
मान्य व्हाया

चुकताच ध्यान 
पुन्हा एक ठेच
पुन्हा एक वेच
साधनेचा

क्षमा याच पदी 
येणे पथावर
दग्ध अहंकार
करीत तो

माये तुज नम्र 
करितो नमन
घेई सांभाळून
बाळ तुझा

विक्रांत वेंधळा
क्रोधात आंधळा
लागतो पायाला
आज तुझ्या 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍




कणभर पापे




कणभर पापे
होतात गगन 
देताच सोडून 
क्षण मात्रे  

करोडो सहज 
जातात सुटून 
खुर्दा चिटकून 
राही परी

सावध रे मना 
राही सांभाळून 
न दे कवळून 
मोह कधी 

अवधूत बापा
आण मार्गावर 
मन हे चुकार 
पुन्हा तुझ्या

काट्याचे कुरूप 
न दे रे होऊन 
टाकी उपटून 
त्याच क्षणी 

विक्रांता साधन
येऊ दे घडून 
सदैव बसून 
दारी तुझा *

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...