सादर
****
सरो अंधार म्हणून मीच पेटवल्या वाती प्राण ओतले प्रकाशी प्रेमे पाजळली दिठी
होत्या अपार अनंत शून्य बसलेल्या गाठी
एक एक सोडतांना दोऱ्या काचल्या रे हाती
ओझे होतेच जन्माचे काही उरले पडले
आणि जीवलग काही घट्ट उराशी धरले
कोडे असतेच एक इथे प्रत्येक मनात
कधी सुटते अडते रुते खोलवर आत
दिस येतात जातात अर्थ उगा मागतात
तया देऊ तरी कसा माझा व्याकुळ एकांत
कुण्या डोळ्यात बसावे कुण्या मनात ठसावे
हात घेऊनी हातात जीणे क्षणात जगावे
कळे एवढेच मला ग्रंथ वाचून अपार
आल्या जीवना असावे सदा प्रेमाने सादर
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️