पावस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पावस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६

स्वामी स्वरूपानंद

स्वामी स्वरूपानंद
**************
अगा स्वामीराया पावसच्या देवा 
जीवाचिया जीवा प्रियोत्तमा ॥१

ऐकता तुमच्या गोड आठवणी 
जातसे भरुनी मन प्रेमे ॥२

तुमची ती मूर्ती ठाकुनिया चित्ती 
होत असे वृत्ती भावमय ॥३

होते पण दुःख आजच्या जन्माचे 
ज्या रूप दर्शनाचे भाग्य नाही ॥४

विश्वाकार तुमच्या पायी ठेवी माथा 
स्वीकारा विक्रांता शरण या ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

स्वामी स्वरूपानंद

स्वामी स्वरूपानंद (पावस) १५ ऑगष्ट 
*******************

स्वरूपी राहिले आनंद होऊन 
देह पांघरून जगासाठी ॥१

सोहं मंत्रराज सगुण साकार 
घेई अवतार जणू इथे ॥२

उच्च जीवनाचे ध्येय मानवाचे 
फलद्रूप साचे झाले इथे ॥३

सहज शब्दात प्रकटले गूढ
परमार्थ पथ उजू झाले ॥४

कोवळ कोमल मोगरा कर्दळ 
गुलाब कमळ उमलले ॥५

सार गीतार्थाचे योगाचे ज्ञानाचे 
झाले जगताचे संजीवन ॥६

आजन्म विक्रांत असे ऋणी त्यांचा 
मन गाभाऱ्याचा नंदादीप ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

धिंडोरा

धिंडोरा ****** तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा    दत्त दिगंबरा पानोपानी ॥ पाहिल्यावाचून  वर्णीतो  रूपाला गातसे  कीर्तीला जागोजागी ...