वाट
****
ती वाट चांदण्याची दिव्य पौर्णिमेची तुझिया दारीची आठवतो
पाय थकलेले श्वास फुललेले
मन आसावले दर्शनाला
आठवे शिखर पूर्वेचा शृंगार
मन निर्विकार शांत झाले
आणि परतणे त्याच त्या देहाने
घडले घडणे घडूनिया
पुन्हा पुन्हा मन तेथे लूचू जाई
कासावीस होई परततांना
तूच ठरविले तिथे येणे जाणे
बहाणे गाऱ्हाणे खेळ सारा
बोलाव अथवा नको बोलावूस
देवा जे दिलेस तेही खूप
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा