चारोळ्यांची कविता
********
मारुनी लाख चकरा पाय जरी दुखले रे
लायकी वाचून कुणा काय इथे भेटले रे भक्ता वाचून देवालया अर्थ काय उरले रे
भक्ता वाचून देवाचे अन् काय इथे अडले रे
लाख डोळ्यात कुणा साठवून काय होते रे
वाहतात अश्रू जेव्हा स्मृतीं खोल खचते रे
सारीच स्वप्न साऱ्यांची तशीच असतात रे
चाकोरीत व्यवहारी सर्व हरवून जातात रे
जगणे म्हणजे शाप कुणी ते म्हणतात रे
जगण्याला घट्ट तेच पकडूनी राहतात रे
चारोळ्यांची कविता ही कविताही नसू दे रे
वाचायची कुणालाही बळजबरी नाही रे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा