अटळ
****
गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची ती कृती भ्याड नामर्द रात्रीची
अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची
ती कृती उद्दाम द्वाड दिवसाची
कसा काय धर्म कळणार तयाला
दृष्टी जी न पाहते कधी सौंदर्याला
ती मुद्रा शांत प्रशांत गौतमाची
नभातील नितळ शुभ्र प्रकाशाची
ते हास्य कोमल प्रेमळ गोरखाचे
चांदणे ओघळले जणू पौर्णिमेचे
कसा द्वेष नांदतो कुठल्या नसात
काय जन्म वाहतो कुणाचा विषात
तया सत्य प्रेम काहीच कळेना
जणू जन्मा आली पुन्हा दानवसेना
जया हाती शस्त्र येते आततायी
तया गत रावणाची रे अन्य नाही
भरले अपराध भरले रे शंभर
अटळ आता अटळ आहे रे संहार
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा