पुन्हा
****
पुन्हा तुझिया केसात अडकले प्राण माझे
पुन्हा तुझिया श्वासात
हरवले भान माझे ॥
पुन्हा ती नजर गेली
सोडूनिया चित्त माझे
झालो पुन्हा फकीर मी
लुटवून सर्व माझे ॥
माझे माझे म्हणता मी
झाले हे सारेच तुझे
हरवून आज गेले
द्वैतातले ओझे माझे ॥
असे वेड जीवास या
नकळे लागले कसे
सदैव स्मृतीत तुझ्या
फिरते हे मन माझे ॥
पुन्हा या गात्रात वीज
लख्ख अशी झंकारते
उमलूनी कणकण
गीत मोहरते माझे ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा