जीवन
******
स्वप्न नभीचे होते कालचे आज तयाचे भान नाही
विश्व उद्याचे होते सुखाचे
पण तयाचे चिन्ह नाही
जग धावते चक्र चालते
नभी पांगते अभ्र काही
परी कुणाला काय कळला
व्यर्थ शिणला शोध तो ही
ये रे धावून घे रे पाहून
गेल्या निघून दिशा दाही
भोग विझले योग हरले
हाती उरले शून्य पाही
नसे हातात काही विक्रांत
असे अपघात जीवनही
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा