थुंकू नका .
*****"
अरे रस्त्यावर थुंकणे हे किती लाजिरवाणे
पशुगत असे करणे
शोभते न मानवास II
थुंकीत जंतू हजार
करती रोग प्रसार
टिबी कोविड हे तर
माहीत तुम्हा यार II
ती तंबाखू तो गुटखा
करू नका रे खा खा
त्या पिचकारीच्या रेखा
की मरण रांगोळ्या.II
या घाणेरड्या सवयी
जाणतोस तू रे भाई
बघ ठरवून सोडून देई
जमेल तुज नक्की II
होईल परिसर सुंदर
राहील निरोगी शरीर
देवालयासम घरदार
भारत भूमीचे या .II
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांaत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा