पाठवले देवे
*********"
पाठवले देवे पुन्हा संसारात मायेच्या जगात जमविल्या ॥१
दावियली देवे तिथे तीच माया
साधूचीया ठाया बसलेली ॥२
इथे या धनाचा चाले व्यवहार
तिथेही व्यापार तोची दिसे ॥३
धनावीन इथे जगतो ना कोणी
आले रे कळुनी पुन्हा पुन्हा ॥४
बहुत दुस्तर तरण्या ही माया
प्रभू दत्तात्रेया तुझी राया ॥५
विक्रांता या देवा कर नाथा सम
सुटो सारा भ्रम कांचनाचा ॥६
नच दिसो डोळा अंग कामिनीचे
रूप माऊलीचे तिथे वसो ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा