****
देहाची ही वाट देहाच्या गावाला जातसे वळून सुखाच्या डोहाला
हिरव्या जाळीत पिकलेली फळे
आंबट वा गोड रुचिर मधाळे
थांबणार पाय वळणार हात
घेता ओंजळीत कैसी रीत भात
कधी जाता भेटे बकुळीची सडा
वेचतांना फुले जीव होतो वेडा
हसू देत कुणी बघू देत कुणी
छातीत भरुनी घ्यावी ती हुंगुनी
फळ फुले पाने बहराचे गाणे
पहावे ऐकावे म्हणावे प्रेमाने
सुख नाकारून आनंद मारून
कर्म दरिद्री तो जातसे निघून
तयाला कैसे रे कळेल जीवन
घेतो जो वैरी स्वत:ला करून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा