बुधवार, २० मे, २०२०

गिरनारी

गिरनारी
**************
येता गिरनारी 
दत्त सोबतीला 
असतो साथीला 
कळतसे ॥
 जाता परतून 
दत्त सोबतीला 
जीव निवलेला 
जाणतसे ॥
येता गिरनारी 
जीव हा अधीर 
डोळीयात नीर 
दाटलेले ॥
जाता परतून 
सुखाचा अपार 
दाटतो सागर 
अंतरात ॥
घडताच भेट 
होई ताटातूट 
जरी जनरीत 
ठरलेली ॥
भेटीगाठीतून
भक्तीस झळाळी 
करुणा बहाळी 
देत असे ॥
विक्रांत पाहतो 
सर्वव्यापी दत्त 
नित्य  गाठ भेट
हृदयात ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लायक

लायक ****** जाणतो मी माझे मन काळे दत्ता  स्तुती आइकता खंत वाटे ॥१ तेच दाटलेले मोहाचे आभाळ  डोळ्यात काजळ अनुरागी ॥२ तीच ती आसक्ती...