अखेरचा श्वास
माझा
सहजी ओंकार
व्हावा
प्राण देहाने
स्वत:च
हळू मोकळा करावा
सांडून साचले
सारे
चित्त रिक्त
मुक्त व्हावे
मी माझेपण बांधले
याद काही न राहावे
मिटताच डोळे आत
जग तत्क्षणी
तुटावे
जाणीवेच्या
सरीतेने
सागरात लीन
व्हावे
असो गोड किंवा कटू
बीज मागे न उरावे
मरणाच्या आधी इथे
मी मृत्यूस
पांघरावे
डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
सुंदर कविता डॉक्टर साहेब....
उत्तर द्याहटवा