शनिवार, २१ जानेवारी, २०१७

भिऊ नको कधी





साखर फुटाने
मावा पेढा राशी
फुलांच्या ढिगात
मन माझे साक्षी

अवघा गोंधळ
धनाचा कल्लोळ
राग लोभ परी
मिटला समूळ

वदे माझे मन
हळूच आतून  
किंवा देवराय
तया संकल्पातून

जळो जन रीत
वृत्तीचा व्यापार
साठव अंतरी
चैतन्य अपार

दोनच दिसाचे
जगणे जगाचे
नाते तुझे माझे
हे जन्मो जन्मीचे

इथे मीच आहे
तिथेही असेन
भिऊ नको कधी
पाठीसी ठाकेन

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माय

माऊली ******* चालव माऊली तुझ्या वाटेवर  जन्म पायावर उभा कर  रांगलो बहुत घेऊनी आधार  इथे आजवर काल्पनिक  भ...