बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५

जगणे ..






येणारा प्रत्येक दिवस 
जगतो आपण

म्हणजे तीच चाकोरी 
तोच नित्यक्रम

एक मार्ग 
एक ठरलेली कृती

अन पक्क्या प्रतिक्रिया 
यात

वाहत असतो आपण



पोटपाणी तर आहेच रोजचं

पण या इवलाल्या सुख सवयी 

यांत्रिक म्हटल्या तरी चालेल

इतक्या अंगवळणी पडलेल्या

सिगारेटच्या धुरा पासून

ते बाईकच्या किक पर्यंतच्या

लिपस्टिकच्या ब्रांड पासून

नेलपॉलिशच्या रंगापर्यंतच्या

अन यात एक जरी चुकलं

वा मनासारखं नाही झालं

तरी बैचेन होते मन  

अन तरीही आपल्याला वाटतं

हेच तर आहे जीवन



पण हे सर वरवरच

अन अव्याहत चालू राहिलेलं

का चाललंय कळत नाही

जे थांबवता येत नाही

वा थांबायला हवे 
हे सुद्धा कळत नाही

अन आत चालू असतो 

तोच गोंधळ तीच रडारड

तीच अतृप्ती अन तीच व्यथा 

प्रत्येक जन असतो

एक रिकामा फुटका घडा



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

२ टिप्पण्या:

वाटा

वाटा ******  वाटा देहाच्या मनाच्या  कशा कळाव्या कुणाला . रोज नकार तरीही  दाटे प्रतिक्षा डोळयाला स्मृती आनंदाची तीच शोधे त्याच त्...