शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

दत्त पिसे










मज लागले रे गुरुदत्त पिसे  
अवधूत पिसे
दिगंबर ||१  
मन विटले रे संसारा थकले   
त्यांनीच दाविले
मृगजळ || 
लावूनिया डोळे तयाचिया वाटे  
मोजितो मी बोटे
काळ गणी ||३
करितो नाटक जगी जगण्याचे  
ध्यानी मनी त्याचे
रूप सजे || 
कधी गल्लीतले श्वान भुंकतात  
पाय धावतात
दाराकडे || 
वाजे खटखट वारियाने दार  
हृदय अपार
उचंबळे ||६
चंदनाचा गंध हीना दरवळ  
ऐसे काही खेळ
मना चाले ||७   
कधी एकटाच असता घरात  
विभूती धुपात
नादावतो ||८
घेवूनी चिमटा नेसुनी लंगोटी 
करुणा त्रिपदी
आळवतो ||  
असे कसेबसे निर्लज्य नाचरे 
कोंडीतो मी सारे
देहभान ||१०

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गुरुदेव

गुरुदेव ***** एक वारी दक्षिणेला एक जाय उत्तरेला  तोच शोध अंतरात फक्त दिशा बदलला ॥ एक वारी गुरुपदी एक वारी देवपदी  तोच ओघ सनातन ध...