एक येईल रे कळ
मग सरेल रे खेळ
लाख करून याचना
नाही मिळणार वेळ
किती आरडा ओरड
तडफड त्या मनात
जीव जाईल क्षणात
कोण ठेवेल
ध्यानात
साधू मिटुनी घे
डोळा
खेळ जाणुनी आंधळा
आत भरला चालला
सारा सुखाचा
सोहळा
दिसे हरेक तयास
यमपुरीस निघाला
अन हव्यास बोजड
घट्ट हातात धरला
साधू उगाच
बसला
नाम स्पंदने भरला
देह टाकला राहीला
दीना कारणे उरला
ऐसा शोधूनी
पुरुष
जन्म कर रे सफळ
किती काळ वाहशील
देह पोटाला केवळ
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा