वयाच्या अठराव्या वर्षी
तिला मरावास वाटलं
गळफास लावून
त्याचं कारणही
तसच काही असावं
अस मला वाटत होत.
पण ती चुरगळलेली चिट्ठी
कुठल्यातरी अमानिक आवेगाने
अन मृत्यूच्या ओढीने लिहलेली .
जेव्हा समोर उलगडली,
तेव्हा समोर होते
ते बालिश तर्कहीन
अव्यवहारी विचार .
हट्टाला पेटलेले
आंधळे झालेले
एखाद्या प्रेषिता सारखे
ठाम गंभीरपणे लिहलेले.
साऱ्या जगाला नाकारून
विजयाची द्वाही पिटणारे.
छे ! छे !!
मरण्यासारख त्यात
नक्कीच काही नव्हत
तरीही मरणाची वकीली करणारे
हे विचार ?
खरच तिचेच असतील का ?
का मरतांनाही
तिने फसविले असेल
स्वत:ला आणि जगालाही
ती कल्पनिक परिस्थिती,
ती हताशा,ती चीड
जगाबद्दलची उदासीनता
आणि त्यासाठी असणार कारण,
न पटणार .
ते एक न सुटणार कोड होत
कारण काहीही असेल
ती चिट्ठी हि कदाचित
तिला लिहता आली नसेल
पण ज्या तुच्छतेने
ती गेली जीवन फेकून
या जगाच्या तोंडावर
त्याची एक जखम
माझ्या आत
खोलवर जावून
मला सतत रुतत आहे.
अस्वस्थ करून
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा