रविवार, १७ मार्च, २०१३

गणिका



जीवन म्हणजे काय हे
कळायच्या आत
त्या येवून पडतात
देह्भोगाच्या नरकात
पर्जन्य काळचे सुंदर
खळखळते निर्झर
येवून पडावेत
गलिच्छ गटारात
तश्या त्या बालिका
होतात गणिका
बालपण न पुसता
काचा कवड्या
खेळता खेळता

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दरवळ

दरवळ  ******* शब्द काही दिलेस मला  तू  रांगोळीत रंग भरतांना  अन् स्वप्न नव्या जगण्याचे तम प्रकाशी विरघळतांना ॥ थरथरले मृदू ओठ तु...