भिजलेल्या
फांदीवर
पक्षी
एकटा भिजत
भिजलेल्या
सुरामध्ये
होता
उगाच झुरत
तेच
एक गाणे त्याचे
किती
किती ऐकायचे
मान्य
प्रेम भंगलय
किती
किती रडायचे
माझे
हे बोल त्याला
मुळीच
पटले नाही
दु:ख
जडले प्रेम ते
कधी
कमी झाले नाही
खिडकी
बंद केली मी
गडद
पडदे खाली
तरीही
त्याची विराणी
घुसतच
आत आली
ओल्या
गर्द अंधारी त्या
पिंजून
पिंजून गेलो
विरघळुनी
सुरात
मग पक्षी
तोच झालो
विक्रांत
प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा