अगा ज्ञानदेवा
***********
अगा ज्ञानदेवा माझिया माहेरा गुज या लेकरा दिलेस त्वा ॥
तुझिया शब्दात नांदतो सुखाने
पांघरतो गाणे स्वानंदाचे ॥
मज दिसे ज्ञान तुवा मांडलेले
अर्थ उघडले हळुवार ॥
काही मी सेविले काही शृंगारिले
जगी मिरविले किती एक ॥
परी पाहतो मी मजला वेगळा
अजूनही उरला मागे काही ॥
आता एकसरा एकरूप करा
पुसूनी पसारा संसाराचा ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️