गवसणे
******
कुणाला हवाय कशाचा फायदा करून वायदा मला मोठा ॥
कुणाला नकोय कुणीच साथीला
एकट्या वाटेला सुख थोर ॥
तरी भिडतात पथ एकमेका
कळेना अवाका जीवनाचा ॥
सारे देणे घेणे ठाऊक दत्ताला
चालणे वाटेला भाग असे ॥
कळावे कळणे थांबावे धावणे
व्हावे गवसणे गाठीतले ॥
चाले जगताचे तेच चक्र जुने
चालू दे फिरणे त्याच्या गती ॥
विक्रांत पाहतो घडते घडणे
वाहते वाहणे प्रवाहात ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️