जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७
बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७
तुला पाहिले
तुला पाहिले
तुला पाहिले
मन भरले
मनात एक
गाणे सजले
किती दूर तू
किती जवळी
पापण्यास या
स्पर्शून गेली
आणि मनाचे
खुळे पाखरू
नभी उडणे
गेले विसरू
तरीही वारे
तया झेलती
अाणिक तारे
हृदया घेती
तुझिया डोळी
जग दुसरे
नवे पणात
साकार झाले
आस मिटली
आणि वाढली
पुन्हा जगावे
इच्छा जागली
हृदयवीणा ही
अशी झंकारली
तू माझ्यातील
कंपण झाली
झाले जगणे
शुभ्र फुलांचे
गंध माधवी
जग क्षणाचे
डॉ.विक्रांत प्रभाकर
तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७
दत्त खुळी
दत्त खुळी
अनवाणी पावलांनी
तंद्री लागलेल्या मनानी
ती भटकते पाऊस पांघरुनी
कृष्णेच्या काठावरती
उंच उंच घाटावरती
उभी राहते
पादुकांसमोर ठाण मांडूनी
पाय रोवूनी
ओरडणाऱ्या
सुरक्षा रक्षकांकडे
चक्क दुर्लक्ष करुनी
हट्टी मुलीसारखी
डोळ्यात पाणी आणूनी
आणि बोलत राहते भरभरुनी
महाराजांविषयी
शब्दात जीव ओतूनी
तेव्हा तिच्या त्या शब्दातून
डोळ्यातून
अन स्वरातून
ओसंडत असते
विलक्षण श्रद्धा अन प्रेम
तो कैफ लागताच
आमच्या रुक्ष पणाला
या मनाच्या बाभळीही
जातात चंदनी होऊनी
तशी ती पक्की व्यवहारी
नीटस संसारी
पण इथे आली की जाते होऊनी
आत्ममग्न संन्यासिनी
अन् मला सारखं वाटत राहते
तिच्या भोवती
महाराज नक्कीच आहेत म्हणूनी
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७
नर्मदा
नर्मदा
तिथे गेल्यावर
मी माझा नुरतो
आकाश होतो
निळेशार ॥
तिथे गेल्यावर
मी माझ्यात मुरतो
धरती होतो ॥
हिरवीगार
तिथल्या घाटावर
लहरत असतो
पाणी होतो
धुवाधार ॥
तिथल्या तटावर
मृत्तिका होतो
विखरून जातो
हळुवार ॥
तिथल्या वाटावर
सारे हरवतो
फक्त होतो
तदाकार ॥
माय नर्मदा
मी तुझे लेकरू
घे ह्रदयी मज
एकवार ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७
जाणिवेची ज्योत
जाणिवेची ज्योत
मनाचिया आत
जाणिवेची ज्योत
पाहते सतत
जगण्यास ||
पाहणे पाहते
वेगळी उरते
क्वचित दिसते
क्षणभर ||
तिचे ते अस्तित्व
कधी मज कळे
अंतर उजळे
क्षणभरी ||
पुन्हा जगण्याचा
उधळतो वारा
कैफाचा धुरळा
कोंदाटतो ||
पुन्हा डोळ्यामध्ये
जमा होते पाणी
मिटते पापणी
आपोआप ||
घडावे जगणे
कळावे जगणे
अस्तित्व फुटणे
गूढ गम्य ||
विक्रांता कबुल
क्षणी या मरणे
परी ते पाहणे
घडो दत्ता ||
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७
मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७
उ:शाप तू
या माझ्या अंधार यात्रेत
कवडसा एक झालीस तू
जगण्याला अर्थ नवा नि
प्रकाश घेवून आलीस तू
म्हटले तर जळणे होते
भोवताली धूर ओढून
म्हटले तर मरणे होते
उगाचच आत कुढून
जसा हलका वारा येवून
उगा जावी ठिणगी पेटवून
आलीस अवचित तशी तू
जगणे माझे गेले उजळून
चकित झालो माझा मी
धडधडणे माझे पाहून
कल्मष जणू होते जिणे
उ:शाप तू आलीस घेवून
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
स्वीकार
स्वीकार ******* करी रे स्वीकार माझा मायबापा आगा दयारूपा माझे म्हणा नाही भोळी भक्ती नाही शक्ती मती परी उपरती खरी असे व्यर्थ म...
-
चांदण्याचे तळे ************ पंचतत्वाचाच देह पुन्हा पंचतत्वी गेला पाश माया ममतेचा एक तुटूनिया गेला पाश घरातले सारे तया घ...
-
गणित ***** गणित या जगताचे नाही कुणास सुटत सारे आकडे अस्थिर नाही कुणास कळत जगी कुणी फुशारतो पुण्य राही मिरवत दिसे तो ही सापडला...
-
उपाधी *****" जडू नये कधी ज्ञानाची उपाधी अभिमान नदी बुडू नये भार पुस्तकांचा घेवू नये माथा तेच शब्द वृथा बोलणारा आत्म विस्...
-
धिंडोरा ****** तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा दत्त दिगंबरा पानोपानी ॥ पाहिल्यावाचून वर्णीतो रूपाला गातसे कीर्तीला जागोजागी ...
-
सार्थ करी दत्ता ************ विश्वाचे कारण तुच दयाघन आहे मी जाणून दत्तात्रेया परी तव कारणे केवळ जगणे मीपण सरणे घडेचिना अशी ...
-
दत्त रिक्त ******** दत्त भूत विसरला दत्त भविष्य नसला दत्त अस्तित्व होऊन याचं क्षणात साठला दत्त नाठवे मनाला दत्त नाठवे तनाला द...
-
मागणे ******* गुणाकार मन माझे गणाकार व्हावे आता अहंकार भंग करी देवा तुच एकदंता ॥ देह बुद्धी नको आता मागणे हे वक्रतुंडा संत संग...
-
स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...
-
पान फाडतांना *********†* मन शोधू नको माझे तू शब्दात सांडलेले अन सांगू नको पुन्हा जोडाक्षर चुकलेले होतेच वादळ वेडे क्षण एक धर...






