मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

वेगळा




वेगळा 
*****

सुटला संदेह
काय माझा देह
राहतो ते गेह
कुणाचे ते

सुटला हा खेळ
अवघा गोंधळ
ज्यात ताळमेळ
मुळी नाही

जन्मा आले तन
लिहिलेले मन
वाहणारा प्राण
अव्याहत

माझे तुझे त्यांचे
एकाच साच्याचे
सुखाचे दुःखाचे
मोजमाप 

विक्रांत वेगळा 
रुप नाव त्याला 
आणिक जयाला 
कळे तो ही 

दत्ता कळू दिले 
स्वप्न उगा आले 
मी पणे पडले 
जाणिवेला 

****
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



सोमवार, १३ जानेवारी, २०२०

देह फोलपट






देह  फोलपट  
***********
देवा सरु दे माझे मी पण
आणिक उरु दे तू तुझे पण

माझेपण होता कधी तुझेपण
नकोस ठेवू रे वेगळे काढून

ठावुक मजला तुझा भक्त सोस
द्वैताचे आवडी घेतोस तू वेष

होवुनिया भक्त जगा विचरसि
मायेच्या खेळात विश्व गुंतविसी

हवे तर ठेव तू ते ही पोर पण
जाणून सारे  दे नेणीवे भरून

मिटो तळमळ  तिमिर अज्ञान
स्वरुपी तुझिया मला मी पाहून

मग वाहु दे दत्ता देह  फोलपट  
सजुन जगात नावाने  विक्रांत

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बाटगे सत्य





बाटगे सत्य .
***********
बाटल्या सत्याला
सत्तेचा आधार
मागते होकार
व्यासपीठ ॥

बाहेर मातीचे
आतल्या गाठीचे
परक्या निष्ठेचे
बाजिंदर ॥

पुजले सापांना
तरी ते डसती
हिशोब मागती
नसलेला ॥

आम्ही ते उदार
सहिष्णू बापाचे
वाहतो चुकांचे
पाप माथी ॥

विक्रांत कर्माचा
मानव धर्माचा
चावत्या डासाचा
परी शत्रू ॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १२ जानेवारी, २०२०

श्री शंकर महाराज



 
श्री शंकर महाराज

**-:

धनकवडीच्या योगी राया
केवळ तुमचे आशीष द्या
तव कृपेचा थेंबासाठी
व्याकूळली हि सारी काया
.
जरी ना भजले तुजला देवा
जाणून घ्या हो माझा भाव
जरी वेंधळा असे मुढ मी
तव पदावरी द्या हो ठाव
.
कुणी जाणले तुजला असे
लपून जगाता दावसी पिसे
फसलो मी ही लीला तुझी
आता जाणले नच की फसे
.
जगत पालका हे अवधूता
तव प्रीतीच्या दावी वाटा
आणिक काही या जगता
नको नकोच या विक्रांता
.
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, ११ जानेवारी, २०२०

करुणा




 करुणा
**
फाटलेले मन
अडके काट्यात
जपे हृदयात
तेच व्रण ॥ १॥

फाटू फाटू जाय
परी सोडवेना
चिंधींत गणना
होऊ नये ॥२॥

आयुष्य ओघळ
झाले सांडपाणी
गंगेची वाहीनी
मना आस ॥ ३॥

इवलीशी सर
झेलून जीवनी
स्वप्न तुझी मनी
पाहतसे॥४॥

विक्रांत दत्ताची
करुणा प्रार्थून
राहे विखरून
पसाऱ्यात॥ ५॥
**
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
****

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...