मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

श्रीदत्त नामाचे l





श्रीदत्त नामाचे l निधान भेटले l जीवास लाभले l महासुख ll ll
कैवल्य सुखाचा l महापूर आला l देहीच पाहिला l निर्विकार ll ll
श्वास प्रश्वासाच्या l जपे अनुष्ठिला l हरवूनी गेला l पाहणारा ll ll
शून्याच्या गाभारी l चैतन्य पुतळा l पाहिला मी डोळा l अनुपम्य ll ll
भाग्याचा सोयरा l जाहलो सहज l गेली गजबज l भवचिंता ll ll
जाहले कल्याण l माझिया जन्माचे l परत येण्याचे l नुरे काज ll ll
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१३

विहिरीच्या काठावर



विहिरीच्या काठावर
उभी सोडुनिया दोर
मनातला घाव मागे    
गर्द हिरवा अंधार  
किती प्रेम शिंपायचं
किती नाते जपायचं
मन चिंध्या झाल्यावर  
कुणा काय सांगायचं २
ठोठावून दार दार
वळ आले हातावर
कुणी कधी ऐकले ना
उरी गारठले स्वर ३
कुठे तरी अंधारात
सारे सारे विसरावं
खोल खोल ऐकांतात
बंध तोडूनिया जावं ४

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

कृपेची दामिनी





करावे साधन l काय ते मी आता l तोच करविता l मायबाप ll ll

माझे हाती असे l बैसणे आसनी l कृपेची दामिनी l करे सर्व ll ll

केली धावाधाव l अनंत उपाय l नाही परी सोय l झाली कुठे ll ll

तया त्या कष्टाचे l झाले आज चीज l पावली ती मज l जगदंबा ll ll

असे दत्त प्रभू l कृपा शक्ती दाता l तयापदी माथा l ठेवियला ll ll

जन्मोजन्मी पुण्य l केले संपादन l त्याचे वरदान l लाभियले ll ll

जरी ना दर्शन l संवाद स्पर्शन l कृपा परी पूर्ण l ओघळली ll ll



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१३

ती भेटली की




ती भेटली की
मज कविता सुचते
अजूनही माझ्या साठी
ती कविताच असते.
आपण कविता लिहितो
असे आपणास वाटते
पण ती कविता
आपली कधीच नसते.
ते तर तिचेच
अमूर्त प्रेम असते
कणाकणातून आपल्या
हळूच रुजून येते .
त्या प्रेमाला आता
काही मागायचे नसते
कुणाकडून काही
मिळवायचे नसते 

विक्रांत प्रभाकर 


 

 


अरुपाचा खेळ l













भक्तीत भिजल्या l मनात कल्लोळ l  

तेजाचा झळाळ l कणोकणी ll ll

आनंदाचा पूर l अष्ट दिश्यांतून l

झाले तनमन l तदाकार ll ll

काही मिळविणे l बाकी न राहिले l

शब्द हरविले l सांगण्यास ll ll

देहाचिया खोळी l अरुपाचा खेळ l

श्रीदत्त प्रेमळ l दावितसे ll ll

विक्रांत प्रभाकर

http://vikrantchishodhyatra.blogspot.in/

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१३

तुझे येणे जाणे





तुझे येणे जाणे

असते जीवघेणे

जसे हाती नसते

फुलांचे फुलणे ..१

विसरलेली पुन्हा

कविता आठवणे

सावरलेले मन

होणे वेडे दिवाणे ..२

उपचार जरी ते

तुझे मोहक हसणे

घडे माझे त्यावर

पुन्हा वितळून जाणे ..३

असे सहज जरी

तुझे पाहणे बोलणे

पण माझे उगाच

नादान खुळखुळणे ..४

नको नको म्हणून

पुन्हा हवे असणे

हवे हवे असून

जीव घोर लावणे ..५

तुझे येणे जाणे ...



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...